अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- जामखेड तालुक्यातील जवळा परीसरातील विविध हॉटेल्स, हातभट्टी, व जुगार अड्यावर जामखेड पोलीसांनी छाप टाकला.
या मध्ये एकुण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना जवळा परिसरात अवैद्य धंदे सुरू आसल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी आपल्या पोलीस पथकाला त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दि ३० डिसेंबर रोजी जवळा गावात अवैध हातभट्टी सुरू असलेल्या ठिकाणी पोलीसांनी कारवाई करत हातभट्टीची गावठी दारू जप्त केली आहे.
तसेच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच जवळा परीसरातील हॉटेल आपुलकी, हॉटेल महाराजा व हॉटेल जगदंबा या तीन हॉटेल वर छापा टाकून या हॉटेल मधिल ६४९६ रु देशी विदेशी दारू जप्त केली आहे.
या घटनेत आरोपी कीरण जवान चव्हाण, नितीन रमेश रजपूत दोघे रा. नान्नज व वैभव विनायक साळवे रा. धोंडपारगाव अशा तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळुंजकर मळा येथे जुगार खेळणाऱ्या चौघांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. अशा एकुण वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये एकुण दहा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.