शहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- जामखेड | माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, मोहन पवार व राजेश वाव्हळ हे तीन नगरसेवक लवकरच आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे

पक्षाचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नगरसेवक निमोणकर व पवार म्हणाले, आम्ही अपक्ष म्हणून निवडून आलो.

मात्र, माजी मंत्री राम शिंदे यांच्यामुळे नगरसेवक राजेश वाव्हळ यांच्यासह तिघेही भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून प्रामाणिकपणे काम केले.

मात्र, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमचा मानसन्मान ठेवला नाही. शहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार पवार यांच्याबरोबर काम करणार आहोत.

पत्रकार परिषदेस माजी उपसभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती सुभाष आव्हाड, नगरसेवक अमित जाधव, आसिफ शेख, मनोज वराट आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24