अहमदनगर ब्रेकिंग : चार सख्खे भाऊ शेततळ्यात बुडाले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   गुऱ्हाळवर काम करणाऱ्या कामगारांची श्रीगोंदा तालुक्यात  चार मुले तेथीलच एका शेततळ्यात पडून बुडाल्याची माहिती आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी गावात शेत तळ्यात पोहायला गेलेल्या चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नमूद दुर्घटना आज २३ जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मृत्युमुखी पडलेले चारही जण सख्खे भाऊ असून, ते परप्रांतीय असल्याचे समजते आहे. या विषयी सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेशातील काही लोक आपल्या कुटुंबासह बाबुर्डी येथील एका गुऱ्हाळावर कामाला आहेत.

तशी त्यांचे दोन, तीन कुटुंब या ठिकाणी काम करतात. कोरोना संक्रमनात यांनी मायदेशी जाणे पसंत न करता, येथेच काम करून गुजराण करण्याचे ठरविले होते. त्यानुसार ते नमूद ठिकाणी राहत होते.

आज येथील एका कुटुंबातील मुले आई, वडिलांना न कळविता शेततळ्यावर पोहोण्यासाठी गेले. पाण्यात जाताना आधाराला ठिबकचा पाईप घेतला होता.

मात्र, तो तुटल्याने ते पाण्यात पडून पोहता न आल्याने त्या चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24