लालूंची सून म्हणतेय सासू व नणंदेने घराबाहेर काढले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पाटणा : सासू व नणंदेने मिळून आपल्याला घराबाहेर काढल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालुप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्याकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी ऐश्वर्याने महिला हेल्पलाइनकडे तक्रार दिल्याची माहिती रविवारी अधिकृत सूत्रांनी दिली. माजी मुख्यमंत्री राबडी देवी व मोठी नणंद राज्यसभा खासदार मीसा भारती या दोघांनी आपल्याला घरातून बाहेर काढल्याचे ऐश्वर्याने तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीची दखल घेत हेल्पलाइनचे अधिकारी प्रमिला, ऐश्वर्याचे आई-वडील व कुटुंबातील इतर सदस्य घेऊन चौकशीसाठी पाटणा येथील राबडी देवींच्या सरकारी निवासस्थानी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू होती.

अहमदनगर लाईव्ह 24