नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने देशात इंधनाच्या दराचा देखील भडका होऊ लागला आहे.
दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर १२ पैशांनी, तर चेन्नईमध्ये १३ पैशांनी वाढवला आहे. परिणामी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८०.३२ रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलच्या किमतीमध्ये मात्र काहीही बदल झालेला नाही.
आखाती राष्ट्रांमध्येही त्याचा फटका बसत असून खनिज तेलाचा सातत्याने भडका उडताना दिसत आहे. परिणामी देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल दराचा आढावा घेताना त्यामध्ये वाढ केली.
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ झाली असून प्रतिलिटर पेट्रोलचा दर अनुक्रमे ७४.६६ रुपये, ७७.३४ रुपये, ८०.३२ रुपये आणि ७७.६२ रुपये आहे.
मात्र त्याचवेळी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मुंबईमध्ये प्रतिलिटर डिझेलचा दर ६८.९४ रुपये आहे.