सलमान खानसोबत काम केलेली ही हिरोईन आता करते धुणी-भांडी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

एकेकाळी सलमान खानच्या सिनेमा मुख्य भूमिकेत दिसलेल्या पूजावर खूपच हलाखीची वेळ आली आहे.90 च्या दशकात पूजाच्या मागेपुढे लोकांची गर्दी असे पण आज हीच पूजा गर्दीत हरवली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात टीबी आणि फुफ्फुसांच्या आजाराने खंगलेल्या पूजाकडे उपचारासाठीही पैसे नव्हते.

पूजाला एका कुटुंबानं त्यांच्या घरात राहायला जागा दिली असून त्याच्या बदल्यात ती त्यांच्या घरातली भांडी घासणं, कपडे धुणं यासारखी लहान-मोठी काम करुन त्यांना मदत करत आहेत.

अभिनेत्री म्हणून यशस्वी होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आलेल्या पूजाच्या करिअरची सुरुवात खूपच चांगली राहिली. पण नंतर सिनेमा किंवा टीव्ही मालिकांमध्ये म्हणावं तसं यश न मिळाल्यानं तिला हे क्षेत्र सोडावं लागलं. पण तिच्या समस्या इथंवरच संपल्या नाहीत. तिच्या या कठीण काळात तिच्या कुटुंबानंही तिची साथ सोडली.

पूजाचं म्हणणं आहे की, तिच्या स्वप्नांप्रमाणं तिच्या कुटुंबानंही तिची साथ सोडली. पण या सर्वांत सलमान खान मात्र देवाप्रमाणे तिच्या मदतीसाठी धावून आला. सलमानच्या टीमनं फक्त तिच्या आजारपणाचा खर्चच केला नाहीतर त्यांनी तिची काळजीही घेतली.

पूजा सांगते, मी जेव्हा लोकांच्या घरी काम करते त्यावेळी अनेकदा मला डिप्रेशन येतं. आत्महत्या करावीशी वाटते. पण मला या सर्वातून बाहेर पडायचं आहे. पुन्हा टीव्ही किंवा सिनेमात काम करून माझं मानानं जीवन जगायचं आहे.

मी पुन्हा अंथरूण पडावे आणि मग लोकांनी मला मदत करावी, असे नको आहे. अद्याप मला कुठलेही काम मिळालेले नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. पण आत्मविश्वास आहे. या जोरावर मी टिफीन सर्विस सुरु केली आहे. तीन दिवसांपूर्वीच मी हे काम सुरु केले. माझा मित्र व दिग्दर्शक राजेंद्र सिंग याने मला टिफिन सर्विस सुरु करण्याचा सल्ला दिला होता. त्यानेच मला याकामासाठी मदत केली, असे पूजाने सांगितले.

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24