पैशावरुन शेतकऱ्यास मारहाण करत खुनाची धमकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात दुपारी ३.३० च्या सुमारास याच भागात राहणारे शेतकरी सुनील चांगदेव निर्मळ , वय ४९ यांना आरोपीशी असलेल्या व्यावसायातील पैशाच्या कारणावरुन
आरोपी अंजाबापू नामदेव गोल्हार , रा . गोल्हारवाडी , ता . राहाता व एक अनोळखी इसम या दोघांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली. लाथाबुक्क्याने व लाकडी दांड्याने मारुन जखमी केले.
पैसे दिले नाहीतर तुला जिवे ठार मारुन टाकू , असे म्हणत खून करण्याची धमकी दिली. जखमी सुनील चांगदेव निर्मळ या शेतकऱ्याने वरीलप्रमाणे काल लोणी पोलिसांत
फिर्याद दिल्यावरुन आरोपी अंजाबापू नामदेव गोल्हार व एक अनोळखी अशा दोघांविरुद्ध भादवि कलम ३२५ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हेका पाटोळे हे पुढील तपास करीत आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24