मदत देण्याचा निर्णय दोन दिवसांत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय दोन दिवसांत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला.

तसेच सडलेले, कुजलेले धान्य मुख्यमंत्र्यांना पाठविण्याची विनंती केली व त्याची पोहच आम्हाला द्या, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, शिवाजी धुमाळ, भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे, सुरेश गभाले, सभापती ऊर्मिला राऊत व सदस्य उपस्थित होते.

मागील तीन महिन्यांपासून धान्य नाही. आम्ही का पेंढा खायचा का? असा सवाल करून शेतातील धान्य अवकाळी पावसाने सडून, कुजून गेले.अद्याप पंचनामे नाहीत.

त्यामुळे नगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पाचनई, पेठ्याची वाडी येथील 50 ग्रामस्थ तहसीलदार कार्यालयात आले. त्यांनी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली रेशन कार्ड मिळावे,

रेशनदुकानाचा परवाना निलंबित करावा व जोपर्यंत धान्य मिळत नाही, तोपर्यंत तहसीलदार कार्यालया बाहेर जाणार नाही, असा निर्णय घेत पाच तास ठिय्या दिला. त्यामुळे अधिकारी वर्गाची धावपळ उडाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24