अंबानींना धोबीपछाड ! ‘ही’ व्यक्ती ठरली आशियातील सर्वात श्रीमंत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. मात्र आता एक नवीन माहिती समोर येत आहे.

मिनरल वॉटर आणि कोरोनाची लस बनविणारे चीनचे उद्योजक टायकून झोंग शानशान यांच्या संपत्तीत यावर्षी खूप वाढ झाली आहे.

झोंग शानशान हे आता फक्त आशियातीलच सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत तर संपत्तीच्या बाबतीत त्यांनी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अलिबाबाचे जॅक मा यांना देखील मागे टाकले आहे.

यावर्षी त्यांचं नेटवर्थ 70.9 अब्ज डॉलर्सवरून वाढून 77.8 अब्ज डॉलर्स इतके झाले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबाबत ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सचा अहवाल सप्टेंबरमध्ये आला होता.

झोंग शानशान हे ज्यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर होते. त्यांना तेव्हा आशियातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुकेश अंबानीनंतर दुसरे श्रीमंत व्यक्ती म्हटले गेले होते.

नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 70.9 अब्ज डॉलर्सवरून वाढून 77.8 अब्ज डॉलरवर यावर्षी झोंगची संपत्ती गेली आहे आणि त्यासह ते जगातील 11व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

त्यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अंबानीपूर्वी ओळखले जाणारे चीनचे टेक दिग्गज जॅक मादेखील झोंगपेक्षा खूप मागे आहे. त्यांची एकूण संपत्ती 51.2 अब्ज डॉलर्स असल्याची नोंद आहे.

अहमदनगर लाईव्ह 24