भारत

SBI कडून 5 लाखाचे कार लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Published by
Ahmednagarlive24 Office

SBI Car Loan : एसबीआय ही देशातील एक प्रमुख पीएसबी आहे. पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टरमधील एसबीआय ही सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात विविध कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

बँकेकडून कार लोन, गोल्ड लोन, पर्सनल लोन, होम लोन अशा नाना प्रकारची कर्ज स्वस्तात उपलब्ध करून दिली जात आहेत. दरम्यान जर तुम्हाला एसबीआयकडून कार लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की, आज आपण एसबीआय कडून पाच लाख रुपयांचे कार लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआय कार लोनसाठी किती व्याज आकारते :-स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक कार लोन साठी 8.85% ते 9.70% एवढे व्याजदर आकारत आहे. या बँकेकडून चांगला सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना कमी व्याजदरात कार लोन पुरवले जात आहे.

जर एखाद्या ग्राहकाचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असेल तर अशा ग्राहकाला एसबीआय कडून 8.85% या व्याजदरात कार लोन उपलब्ध होऊ शकते. दरम्यान, आता आपण जर एखाद्या ग्राहकाला 8.85% या व्याजदर राहत पाच लाख रुपयांचे कार लोन 5 वर्षांसाठी उपलब्ध झाले तर त्याला किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार या विषयी माहिती पाहणार आहोत.

5 लाखाच्या कार लोनसाठी कितीचा मासिक हफ्ता:- एसबीआय कडून जर 8.85% व्याजदरात 5 लाखाचे कर्ज पाच वर्ष कालावधीसाठी उपलब्ध झाले तर दहा हजार 343 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

या पाच वर्षांच्या काळात कर्ज घेतलेल्या व्यक्तीला एक लाख वीस हजार 569 रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे. म्हणजेच पाच लाखाच्या कार लोनसाठी ग्राहकांना सहा लाख वीस हजार 569 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये मूळ रक्कम आणि व्याज यांचा समावेश राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office