Categories: भारत

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू म्हणाली मी माझ्या प्रियकराची अमानत आहे, मला स्पर्श करु नकोस…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  स्वप्नातील राजकुमारीशी लग्न केल्यानंतर आनंदात असणारा नवरा नववधूच्या एका वाक्यामुळे सुन्न झाला जेव्हा त्याच्या पत्नीने त्याला स्पष्टपणे सांगितले की ती इतर कुणाची आहे,आणि त्याने तिला स्पर्श करु नये.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील आहे, काही दिवसांपूर्वी परदेशातून  हा तरुण लग्नासाठी गावी आला होता, मुकंदपूर या गावच्या युवकाचे त्याच्याच जवळच्या गावतील एका मुलीशी लग्न झाले, मुलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे लग्नाचा संपूर्ण खर्च मुलाच्या कुटूंबाच्या वतीने खर्च करण्यात आला.

लग्नासाठी मंडपात एक व्यक्ती आली, ती मुलगीची प्रियकर होती पण वधूचा भाऊ म्हणून संपूर्ण सोहळा भटकत होती. इतकेच नाही तर जेव्हा मुलीची पाठविण्याची तयारी सुरू झाली तेव्हा याच खोट्या भावाने कर्तव्य बजावताना स्वत: नववधूस निरोप दिला.

मुलगी नवर्याच्या घरी पोहोचताच रात्रीच्या वेळी मुलाच्या घरातील लोक नवीन विधी करीत होते, त्याचवेळी तिच्या प्रियकराने दारू पीत पेयसीच्या सासरी पाऊल ठेवले त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला असे वाटले की भाऊ व बहिणीच्या विरहामुळे दुखी असेल ज्यामुळे तो दारू पिऊन तिच्या घरी आला, मात्र त्या रात्री त्या मुलीने रात्री उशीरा त्याची समजूत काढून प्रियकरास तेथून परत पाठविले,

जेव्हा रात्री पती आणि पत्नी त्यांच्या खोलीत गेले, तेव्हा पत्नीने पतीला स्पष्टपणे सांगितले की मी तुझी नाहीय माझ्या प्रियकराची अमानत आहे, मला स्पर्श करु नये… मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकून मुलाला धक्काच बसला दुसर्या दिवशी मुलीने पोलिस आणि नातेवाईकासमोर सांगितले मला माझ्या प्रियकराबरोबर लग्न करायचे आहे, तिच्या कुटूंबियांनी तिच्या संमतीविना परदेशातील या मुलाशी लग्न लावून दिले.आता ती तिचा नवरा सोडून प्रियकराकडे आली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24