अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळेतय. परभणीत एक लिटर पेट्रोलसाठी जवळपास ९५ रुपये मोजावे लागत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
परभणीमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी ९४.६५ रुपये मोजावे लागणार आहेत. शनिवारी सर्वाधिक पेट्रोल वाढ ही नांदेडमध्येही होती. नांदेडमध्ये प्रति लीटर पेट्रोलचा दर ९४.३३ रुपये इतका होता.
तर परभणीमध्येही प्रति लीटर पेट्रोलता भाव ९४.१२ रुपयांवर होता. दरम्यान, जालन्यामध्ये प्रति लीटर पेट्रोलचा दर ९३.८४रुपये असून उस्मानाबादमध्ये ९३.३० आणि गडचिरोलीमध्ये ९३.०६रुपये प्रति लीटर आहे.
वाढत्या इंधन वाढीमुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ९० च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे ८० रुपयांच्या पार गेले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात . पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते.
मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.