NHM Thane Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता. अर्ज कसा आणि कुठे सादर करायचा आहे, ते पुढीलप्रमाणे :-
राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (पुरूष), परिचरीका (महिला), बहुउद्देशीय कर्मचारी” पदांच्या एकूण 202 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा सादर करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी आपले अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता गरजेची असेल..
वैद्यकिय अधिकारी : MBBS/BAMS
परिचारीका (पुरूष) : GNM/BSC Nursing
परिचरीका (महिला) : GNM/BSC Nursing
बहुउद्देशीय कर्मचारी : 12 th Pass in Science +Paramedical Basic training Course OR Sanitary Inspector Course
अर्ज शुल्क
वरील साठी उमेदवारांकडून अर्ज शुल्क देखील आकारले जात आहेत, हे शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता 150/- रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये असे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
इच्छुक उमेदवार ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२ या पत्त्यावर आपले अर्ज
29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवू शकतात.
अधिकृत वेबसाईट
उमेदवारांना या भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://thane.nic.in/ ला भेट द्या.
अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे :-
पुर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट,वयाचा पुरावा, पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र), गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (AsApplicable), शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये कामाचे अनुभव प्रमाणपत्र, जात/वैधता प्रमाणपत्र, आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), आधारकार्ड, पॅन कार्ड, अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Gazette), वाहन चालविण्याचा परवाना, लहान कटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र), फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र, युनियन बँकेचा Demand Draft, अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करुन सादर करावे.
अशा प्रकारे अर्ज करा
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत, उमेदवार अर्ज 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करू शकतो.
-उमेदवारांनी अर्ज करताना लक्षात घ्या अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. तरी अर्ज करण्यापुर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.