Diary Business Success Story:- कृषी क्षेत्राला जोडधंदा म्हणून भारतामध्ये पूर्वापारपासून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पशुपालन व्यवसायामध्ये गाय आणि म्हशींचे पालन व त्या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत अगोदरपासून राहिलेला आहे.
पशुपालना सोबतच शेळीपालन तसेच अलीकडच्या कालावधीपासून व्यावसायिक दृष्टिकोनातून आता कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ज्याप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान येऊ घातले आहे.
अगदी त्याचप्रमाणे आता पशुपालन आणि शेळीपालन व्यवसायामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्याने अनेक जातीवंत अशा गाई व म्हशीच्या जाती विकसित करण्यात आलेले आहेत व त्यामुळे वाढीव दुधाचे उत्पादन मिळवणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे.
अगदी याच पद्धतीने जर आपण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी महादेव रंदुरे यांची यशोगाथा बघितली तर ती इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी अशी आहे.
या शेतकऱ्याने गायीच्या एचएफ या जातीचा संपूर्णपणे अभ्यास केला व तिचे आर्थिक गणित समजून घेऊन या गायीच्या पालनाला सुरुवात केली व आज त्यांचा गाई पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारला असून नुसत्या दूध विक्रीतून हा शेतकरी 22 लाख रुपयांची उलाढाल सध्या करत आहे.
दूध विक्रीतून सोलापूरचा शेतकरी वर्षाला करतो 22 लाख रुपयांची उलाढाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की,सोलापूर जिल्ह्यात असलेल्या मोहोळ तालुक्यामध्ये कोरवली नावाचे गाव असून या गावाला महादेव रंदुरे यांचे नातेवाईक राहिला आहेत.
त्यांच्याकडून महादेव यांनी सुरुवातीला एक गाय विकत घेतली. यावेळी त्यांच्यावर अशी वेळ होती की त्यांना उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून कामाला जावे लागत होते. परंतु ही एक गायीच्या साह्याने त्यांनी गाय पालनाला सुरुवात केली व कालांतराने त्यांनी एचएफ जातीची गाय विकत आणली व हळूहळू गाईंच्या संख्येत वाढ केली व स्वतःचा दूध व्यवसाय सुरू केला.
आज त्याच्याकडे गोठ्यात एकूण 17 एचएफ जातीच्या गायी असून या गाईंच्या माध्यमातून दररोज 200 ते 250 लिटर दुधाचे उत्पादन त्यांना मिळते. आपल्याला माहित आहे की या जातीच्या गाई या प्रामुख्याने पाश्चात्य देशातील म्हणजेच फ्रान्स, आइसलँड व नेदरलँड इकडच्या असून देशी गाई पेक्षा एचएफ जातीच्या गायींची वार्षिक दूध उत्पादन क्षमता जास्त आहे.
देशी गाईच्या तुलनेमध्ये जर्शी आणि एचएफ जातींच्या गाईंपासून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. महादेव रंदुरे हे गाईच्या दुधाची विक्रीच नाही तर त्या दुधापासून तूप, खवा तसेच दही व पनीर सारखे दुधावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करतात व घरगुती पातळीवर बनवून त्यांची विक्री देखील करत आहेत. सध्या दूध विक्रीतून ते वर्षाला 22 लाखांची उलाढाल करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
काय आहेत एचएफ गाईचे व तिच्या दुधाची वैशिष्ट्ये?
गाईची एचएफ जात ही जगातील सर्वाधिक दूध देणाऱ्या जातींपैकी एक असून ही जगातील एकमेव अशी जात आहे जिच्या बैलामध्ये इतके वीर्य असते की ज्यापासून फक्त वासरे जन्माला येतात.
या गाई एका वेतामध्ये पाच हजार सहाशे ते दहा हजार लिटर दूध देतात. या गाई थंड प्रदेशातील असून त्यांना गरम वातावरण सहन होत नाही. गरम ठिकाणी जर या गाई असल्या तर त्यांची दूध उत्पादकता कमी होऊ शकते. या गायीच्या दुधाचे वैशिष्ट्ये पाहिले तर एचएफ जातीच्या गायीचे दूध संपूर्ण जगात वापरले जाते.
जर या जातीच्या गाईंची दूध उत्पादन क्षमता पाहिली तर ती गाईच्या जातीच्या दर्जावर अवलंबून असते. तरी साधारणपणे एक गाय दररोज 15 लिटर पासून ते 70 लिटर पर्यंत दूध देऊ शकते.एका वेतात याच्यात जातीच्या गाई पाच हजार सहाशे ते दहा हजार लिटर पर्यंत दूध देतात.