निळवंडेची पाहणी करून जलसंपदामंत्री म्हणाले कि निळवंडे कालव्यांची कामे….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरणा कालव्यांच्या कामासाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचा अगदी दररोज पाठपुरावा असून 2022 च्या मध्यापर्यंत प्रकल्पाचे पूर्ण काम मार्गी लागून लाभक्षेत्रात पाणी देण्याचा प्रयत्न राहील.

या कामासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे .. जवळेकडलग येथील आढळा नदीवरील आढळा सेतू पुलाच्या कामाची पाहणी प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी समवेत राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात , ऊर्जा रायमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, सिताराम पा. गायकर, रामहरी कातोरे, चंद्रकांत कडलग, पं. स. सदस्य विष्णुपंत रहाटळ कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे,

अजय फटांगरे ,राजेंद्र कडलग ,भानुदास तिकांडे, कपिल पवार, मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता श्रीमती अलकाताई अहिरराव उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे ,कार्यकारी अभियंता गिरीश सांगानी ,

कार्यकारी अभियंता प्रमोद माने, संगीता जगताप गणेश नानोर आदी उपस्थित होते . याप्रसंगी नामदार पाटील म्हणाले की, उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी निळवंडे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे . काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचे काळातच या धरणाचे काम पूर्ण झाले.

याच काळात या कामाला गती मिळाली होती. मात्र मागील पाच वर्षात काम थांबले होते .महा विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पासाठी 491 कोटीची भरीव निधीची तरतूद केली आहे. व या कामाला गती दिली असून

निळवंडे कालव्यांच्या कामाला नामदार बाळासाहेब थोरात यांनी दररोजच्या पाठपुरावा करून अत्यंत प्राधान्य दिले आहे. सर्वत्र कोरोना चे संकट आहे तरीही या कामाला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही .

2022 मधील पावसाळ्याच्या मध्यावर या प्रकल्पाचे पूर्ण काम होऊन लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी विविध ठिकाणची स्ट्रक्चरल कामे, जमीन अधिग्रहण ,पुलाची कामे अशी अनेक कामे तातडीने मार्गी लावली जात आहे ..

तर महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे .आपण यासाठी सातत्याने काम करत आहोत. हे काम पूर्णत्वास येत आहे हा मोठा आनंद आपल्याला आहे .

लवकरात लवकर लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणी देण्यासाठी महा विकास आघाडी सरकार काम करत असून राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार पाटील यांनी सातत्याने या कामासाठी मोठी मदत केली आहे .. यावेळी नामदार जयंत पाटील ,नामदार थोरात ,

ना. तनपुरे यांनी पुलाची स्ट्रक्चरल कामे, माती व खोद कामे , जमीन अधिग्रहण करणे या सर्व कामांची माहिती घेऊन सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिले आहेत .यामुळे सर्व दुष्काळी भागातील शेतकर्‍यांमध्ये मोठा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .

अहमदनगर लाईव्ह 24