अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- नगर-औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर परिसरात विहिरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होऊन सदर मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

याबाबत, समजलेली माहिती अशी की सुनील पांडुरंग टीमकरे हे आपल्या शेतात मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे दुर्गंधी आल्याने त्यांनी वेळी डोकावले असता पाण्यात तरंगताना महिलेचा मृतदेह दिसला त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांशी संपर्ककरून सदर घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला मात्र या महिलेची ओळख पटली नसून तिचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24