अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- विकेंडला भंडारदरा धरण परिसरात पर्यटनावर बंदी घालण्यात आली असली तरी लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे चित्र दिसले. शुक्रवारी धरणातील पाण्यात एका पर्यटकाचा बळी गेला.
भंडारदरा धरणाच्या सांडव्याच्या वक्राकार लोखंडी दरवाजाजवळ (स्पीलवे) अज्ञात पर्यटकांचे बुट, पायमोजे व इतर साहित्य बेवारस मिळून आले. धरणातील पाण्यात पर्यटक बुडाल्याने स्थानिक लोक व पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता.
मात्र पर्यटकांनी तेथे गर्दी केल्यानंतर शोध कार्यात अडथळे येत होते. शोध कार्यात बाधा येऊ नये म्हणून पोलिसांकडून तेथे येण्यास पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातली. मात्र याचा राग येऊन काही पर्यटकांनी पोलिसांशीच हुज्जत घालून मारहाण केली.
यात दोन पोलीस जखमी झाले. याप्रकरणी सहा पर्यटकांविरोधात राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर धरणात बुडालेल्या पर्यटकाचा कॉन्स्टेबल संजय शिंदे, प्रकाश खाडे, विठ्ठल अंबवणे, निवृत्ती खाडे, विष्णु वैराट यांस शुक्रवारी रात्रीपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला.