अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन, अथवा इथर यासारख्या करन्सी खरेदी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढते आहे. क्रिप्टोकरन्सी ही एक अभासी करन्सी म्हणजेच व्हर्चुअल करन्सी आहे.
त्यामुळे केवळ ती आहे असे समजून व्यवहार करावे लागतात. या करन्सीत गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीही ही करन्सी खरेदी करु इच्छित असाल तर आगोदर काही गोष्टींची माहिती जरुर घ्या. क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या व्हर्च्युअल करन्सी खरेदी करणयासाठी आपल्याला प्रथम एक अकाऊंट उघडावे लागेल.
जे आपण क्रिप्टोकरेंसी एक्सचेंज द्वारा उखडू शकता. भारतात आजघडीला अनेक वेगवेगळी Cryptocurrency Exchange उपलब्ध आहेत. Cryptocurrency Exchange खरेदी करताना शक्यतो अशीच एक्चेंज निवडा जी भारतात नोंदणीकृत आहे. जिचे कार्यालय भारतातच आहे.
तसेच, ही एक्स्चेंज आपली KYC व्हेरीपीकेशन मागेल. शक्यतो अशीच एक्सचेंज निवडा जी सुरक्षा आणि नियमांचे पालन करेन. क्रिप्टोकरन्सीत डीलिंग आणि ट्रँज्येक्शन होते. त्यामुळे अकाऊंट उघडण्यापूर्वी हे जरुर पाहा की तुम्ही ज्या करन्सीत गुंतवणूक करु इच्छिता त्यासोबत ही एक्सचेंज डील करते किंवा नाही.
अकाऊंट उघडल्यावर केवायसी प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपण आपली खरेदी विक्री सुरु करु शकता. आपणास क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यापूर्वी एक्सचेंजवर पेमेंट मेथडमध्ये आपली बँक अकाऊंट लिंक करावे लागेल. जिथे क्रिप्टोकरन्सी खरेदी केल्यावर पैसे कटतील. त्यानंतर आपल्याला ऑर्डर द्यावी लागेल.
आपल्याला जी करन्सी खरेदी करायची आहे. जितकी खरेदी करायची आहे. हे सर्व सांगावे लागेल. आपण जी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत आहात त्याची बाजारातील किंमत तपासा. ट्रेंडिंगमध्ये तो कशी कामगिरी करतो आहे तेही पाहा. ही सर्व माहिती पाहिल्यावरच ‘Buy’ ऑप्शनवर क्लिक करा.