विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई नसल्याने शेतकरी पिकविमा काढत नाहीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- २०१८ पासून तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकरी विमा योजनेत सहभागी होतात यासाठी की नैसर्गिक आपत्ती जोखीम म्हणून नुकसान भरपाई मिळावी पण गेल्या दोन तीन वर्षांत, अशी भरपाई मिळाली नसल्याने या वर्षी शेतकऱ्यांचा विमा भरण्याकडे ओढा कमी असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

नेवासे तालुक्यातील शेतकरी पिक विमा भरण्यासाठी दरवर्षी आघाडीवर असते. खरीप व रब्बी हंगामातील पिकासाठी विमा योजनेत सहभागी होतात. पण गेल्या २०१८-२०२१ पर्यंत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती जोखीम म्हणून कसलीही आर्थिक मदत विमा कंपन्या कडून मिळाली नाही.

तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांनी पिक विमा भरले होते. मागील वर्षी नेवासे तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिके अति पावसाने सडून गेले. यात कपाशी, तुर, बाजरी, सोयाबीन,अदि पिके पावसात वाया गेले शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला.

या नुकसान झालेल्या पिकाचे कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे केले व शासनाला अहवाल सादर केला.

तसेच शासन अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून हेक्टरी १०,००० रुपये देणार होते.परंतु अजूनही मदत नाही.

अहमदनगर लाईव्ह 24