वर्षातच १०६ कोटींची शब्दपुर्ती करून आ.रोहित पवारांनी जपले शेतकऱ्यांचे ‘हित’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-कुकडी म्हटलं की डोळ्यासमोर येतात तालुक्यातील भु-संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा…यापुर्वी कधीही न झालेलं पाण्याचं नियोजन…अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नसलेला ठावठिकाणा… बुजलेल्या कुकडीच्या चाऱ्या अन् विजलेल्या भु-संपादन मोबदल्याच्या आशा! मग त्याची एंट्री झाली,त्याने सगळी गावे पिंजून काढली, तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या,त्याने पंचवीस वर्षांपुर्वीचा भु-संपादानाचा प्रश्न मार्गी लावण्याचा ‘शब्द’ दिला आणि तो खराही करून दाखवला आहे.हो!

ही दमदार कामगिरी केली आहे युवा आ.रोहित पवार यांनी.कारण पुन्हा एकदा कर्जत तालुक्याच्या ८ गावातील शेतकऱ्यांना तब्बल ५१ कोटी रुपयांची भु-संपादनाची रक्कम मंजूर करून घेत आ. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना सुखद धक्काच दिला आहे.

कुकडी नियोजनातील कमी वेळेत खेचुन आणलेली ही सर्वात मोठी रक्कम म्हणावी लागेल.बेनवडी,कोळवडी,करमनवाडी,देशमुखवाडी,तळवडी,आळसुंदे,डोंबाळवाडी,माळंगी या गावांचा यामध्ये सामावेश आहे.

या अगोदरही टप्प्याटप्प्यात सुमारे ५५ कोटी रुपये आणि आता एकदाच ५१ कोटी रुपये म्हणजेच आत्तापर्यंत १०६ कोटींचा हा मोबदला शेतकऱ्यांची वचनपुर्ती करणारा ठरला आहे.गेली २५ वर्षात ६ कोटी रुपयांत समाधान मानावे लागलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एका वर्षात १०६ कोटी मिळाले हा बदल नक्कीच ‘विकासाचे व्हिजन’ साधणारा आहे.

आता भु-संपादन मोबदला तर मिळालाच परंतु शेतकऱ्यांना दिलेला ‘टेल टू हेड’ चा शब्द पुर्ण करण्यासाठी चाऱ्या अस्तरीकरण,पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी काढलेले डिप कट,दगडमातीने बुजलेल्या चाऱ्या,

कालव्यातील काढण्यात आलेला गाळ,कुकडी चाऱ्यांवर बसवण्यात आलेले दरवाजे यासाठीही आ.रोहित पवारांनी ‘ना भूतो ना भविष्य’ असे भरीव काम केले आहे.वर्षानुवर्षे रेंगाळत पडलेल्या कुकडी डाव्या प्रकल्पाचा परिपुर्ण अभ्यास करून एकाच वर्षाच्या कालखंडात आ.रोहित पवारांनी सर्व प्रश्न मार्गी लावत कुकडीला नवसंजीवनी प्रदान केली आहे.

यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाला संघर्ष न करता आपल्या हक्काचे पाणी मिळू लागले आहे.आ.रोहित पवार हे खुद्द राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे नातु असले तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वतः उभा राहून आपले काम करून घेणारे नेते आहेत.

अभ्यासु व चाणाक्ष पद्धतीने मांडणी करून आपल्या विषयाकडे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात.भु-संपादनासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील,उपमुख्यमंत्री अजित पवार,

कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता ह.तू.धुमाळ,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकता. ना. मुंडे व यासंबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचे आ. रोहित पवार यांनी आभार मानले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24