पंकजा मुंडे म्हणतात या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

पण, सरकारला जे जरी उशिरा सुचले असेल पण आणखी अनेक राजीनामा घेतल्यावरच दुरुस्त म्हणता येईल,

असं म्हणत भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर एकच भडीमार सुरू केला आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

देर आये पर दुरुस्त नहीं आये ‘, या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24