प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाडीत बसून मारहाण व लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांनी छडा लावून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी या गुन्ह्यात शुभम भागाजी बुगे (रा. बुगवाडी, ता. पारनेर, जि.अ.नगर) व साथीदार विनोद सुधाकर पाटोळे. (रा. बहिरवाडी, जेऊर, ता. नगर, जि. अनगर ,) आकाश संतोष नायकोडी , (रा.जामगांव, ता, पारनेर, जि. अनगर ) व एक विधी संघर्षीत बालक असे त्यांची नावे आहे.

दरम्यान त्यांच्या ताब्यातून धारदार शस्त्र तसेच मोबाईल असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ सांगळे हे दि. २ एप्रिल रोजी सुमारास त्याना एका कारने माळीवाडा बसस्थानक येथुन प्रवासी म्हणून जात असताना निमगाव वाघा शिवार येथे घेवुन जावुन आरोपींनी लोखंडी रॉड ने मारहाण केली.

त्यांचेकडील मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्रे बळजबरीने काढून घेतले. दरम्यान आरोपींनी गुन्ह्यातील वापरलेली कार व आरोपी हे पारनेर व जामगाव परिसरातील असल्याचे पोलिसांना खब-याद्वारे माहिती मिळाली.

सदरचे आरोपी हे नेप्तीरोडने येणार असल्याच्या माहिती वरून कोतवाली पोलिसांनी सापळा लावून त्याना मोठ्या शिताफीने पकडले. त्याची कसून तपासणी केल्यानंतर त्यानी गुन्ह्याची कबुली दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24