अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- राज्यातील भारतीय जनता पक्षाची बैठक होऊन यामध्ये ठराव करून सर्व साखर कारखान्याची ईडीमार्फत चौकशी करावी असे पत्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पाठवून भाजपने सत्ता मिळवण्यासाठी चालवलेला हा सर्व आटापिटा आहे
अशी टीका आमदार रोहित पवार यांनी कर्जत मध्ये बोलताना केली. आमदार रोहित पवार हे कर्जत तालुक्यातील थेरवडी या गावांमध्ये रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना
त्यांनी भारतीय जनता पक्षावर प्रखर टीका केली यावेळी ते म्हणाली की सत्ता मिळवण्यासाठी ईडी चा वापर हा संविधानाला धरून नाही.
भाजपने ईडी हे राजकीय हत्यार केले आहे. राज्यातील भाजपा नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांना पत्र पाठवताना मराठा आरक्षण व ओबीसींची राजकीय आरक्षण हे प्रश्न सोडवण्यासाठी पत्र लिहिले असते तर ते जास्त योग्य झाले असते
असे सांगून रोहित पवार यावेळी म्हणाले की, मराठा आरक्षण व ओबीसींचे आरक्षण हे दोन्ही प्रश्न केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे याचा सर्वांच्या लक्षात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील तशी निर्देश दिले आहेत.
त्यामुळे भाजपने केवळ सत्ता द्या मग प्रश्न सोडवू असे म्हणणे हा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. गुजरातला पुरा साठी 1000 कोटी मदत देणारी देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे थकलेले 28 हजार कोटी देण्यास तयार नाहीत वास्तविक पाहता
महाराष्ट्राने देखील भाजपाचे खासदार निवडून दिले आहेत. याचा विसर त्यांना पडलेला दिसतो महाराष्ट्रातील लोक हे या देशातले नाहीत का असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी आता थेट केंद्राला विचारला आहे.