अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-विम्याची कल्पना खूप जुनी आहे. जोखीम ही अनेकांमध्ये कशी वाटता येईल ही त्यामागची मुख्य कल्पना आहे. इसवीसन पूर्व २००० वर्षापासून चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली.
जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावयाच्या असतील तर ते त्या वस्तू अनेक जहाजांत वाटायचे त्यामुळे एखादे जहाज बुडाले, लुटले गेले तरी सर्वनाश होत नसे. इसवीसन पूर्व १७५६ मध्ये बॅबिलोनियन व्यापाऱ्यांनीच हमुरबी कोड नावाची पद्धत सुरू केली त्यावेळी जहाजातून माल नेण्याकरिता व्यापाऱ्यांना कर्ज काढावे लागत असे.
हमुरबी कोडप्रमाणे जर या सफरीत ते जहाज चोरीला गेले/बुडाले तर काढलेले कर्ज त्या व्यापाऱ्याला माफ करण्यात येई, परंतु व्यापार करून ते जहाज सुरक्षितपणे परत आले तर मात्र त्या व्यापाऱ्याला कर्ज देणाऱ्याला कर्जापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागे. भारतात विम्याची कल्पना खूप पूर्वीच्या लिखाणात वाचायला मिळते.
मनुस्मृती, याज्ञव्यल्क्य स्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र या पुस्तकांत विम्याचा उल्लेख सापडतो. इंश्युरन्सद्वारे आपण आपल्या जीवनातील फाइनेंशियल रिस्क कमी करत असतो. विमा हा आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचे रक्षण करतो. आम्ही तुम्हाला विविध प्रकारच्या विमा बद्दल माहिती देणार आहोत. जाणून घेऊयात या विषयी-
१) कार इंश्युरन्स भारतात कार :- विमा आवश्यक आहे. हे जीवन विमा किंवा आरोग्य विमा प्रमाणेच आहे. आता ऑनलाइन माध्यमातून देखील आपण हा विमा खरेदीकरूशकता. बर्याच कंपन्या ऑनलाईन कार विमाही देत आहेत. परंतु आपल्या कारचा विमा काढण्यापूर्वी, वेगवेगळ्या कंपन्यांच्या धोरणांची, प्लॅन्सची तुलना करा. आपल्यासाठी सर्वात योग्य असा प्लॅन निवडा.
२) टर्म लाइफ इंश्युरन्स :- भारतात टर्म लाइफ इंश्युरन्स घेणारे फार कमी लोक आहेत. कारण त्यांना वाटते की जे प्रीमियम म्हणून भरलेले पैसे परत मिळणार नाहीत. त्यामुळे ते पैसे मिळणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. टर्म लाइफ इंश्युरन्समध्ये पैसे परत मिळत नाहीत, पण कव्हर खूप जास्त मिळतो. म्हणजेच तुम्हाला मनी बॅक पॉलिसीमध्ये प्रीमियम भरून 2 लाखांचा विमा मिळवत असाल तर , त्याच प्रिमिअम मध्ये टर्म इंश्योरेंस 25 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम देते. दुर्दैवाने मृत्यू झाला तर कुटुंबाला तातडीने 25 लाख रुपये मिळतील.
३) मनी बँक इन्शुरन्स :- जर आपण टर्म इन्शुरन्स घेतला असेल तर आपण मनी बँक इन्शुरन्सचा विचार करू शकता. जर आपण मुदत ठेवीऐवजी मनी बँक इन्शुरन्समध्ये पैसे ठेवले तर ते अधिक चांगले. त्यात विमा संरक्षणासह पैस्यावर व्याज देखील मिळेल. आपण जिवंत असेपर्यंत पॉलिसी मॅच्युअर झाली तर आपल्याला बँक किंवा सरकारी ठेवीवर जेवढे व्याज मिळते तेवढे मिळणार नाही परंतु जोपर्यंत पॉलिसी राहील तोपर्यंत आपण शांतपणे जीवन जगू शकता.
४) चाइल्ड प्लॅन – शिक्षणाचा खर्च खूप वेगाने वाढत आहे. जरा विचार करा, जर आपल्या मुलाची बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चांगल्या ठिकाणी निवड झाली, जिथे त्याला लाखोंची फी भरावी लागत असेल तर ? चाइल्ड प्लॅन यावेळी आपली मदत करेल. चाइल्ड प्लॅन अंतर्गत पहिल्यांदा तुम्हाला एकदम रक्कम मिळते आणि दुसरे म्हणजे, पॉलिसीधारकाचा मृत्यू जरी झाला तरी मुलाला त्याचा फायदा होतो. म्हणजेच, आपण नसले तरीही, आपल्या मुलाचे शिक्षण सुरू राहील. यासह, तुम्हाला प्रीमियमवर आयकरमध्ये कलम 80D अंतर्गत सूट देखील मिळते. पॉलिसी अंतर्गत प्राप्त पैसे कलम 10 (10 डी) अंतर्गत करमुक्त आहेत.
५) गंभीर आजार म्हणजेच क्रिटिकल इलनेस :- अचानक एखादा गंभीर आजार जडला असेल तर त्यामध्ये पाण्यासारखे पैसे जातात. अशा परिस्थितीत अनेक कुटुंबांची बँक खाती रिकामी झाल्याची उदाहरणे आहेत. रुग्ण बरा होवो किंवा न होवो निश्चितच कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. असे आर्थिक संकट टाळण्यासाठी आपण आरोग्य विमा घेणे महत्वाचे आहे. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या गंभीर आजारांवर विमा संरक्षण देतात. आपण हे आरोग्य विमासह घेऊ शकता.
६) यात्रा विमा- बर्याच लोकांना यात्रा विमा याचा अर्थ म्हणजे केवळ प्रवासात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबाला पैसे मिळतात एवढाच वाटतो. परंतु यात बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या गेल्या आहेत. हरवलेले पासपोर्ट, मेडिकल इमर्जन्सी, हरवलेले सामान आदींचा समावेश आहे. आपल्याकडे एक वर्षाचा यात्रा विमा असल्यास आपण त्या दरम्यान कुठेही गेलात तर आपला प्रवास सुरू झाल्यापासून, प्रवास संपेपर्यंत आपण या विम्याच्या अंतर्गत असाल. कार्यालयीन दिवसांसाठी प्रवास करणार्या लोकांसाठी हे नक्कीच फायदेशीर आहे. टर्म पॉलिसी घेताना आपण ट्रॅव्हल इन्शुरन्सची निवड देखील करू शकता. मग प्रीमियममध्ये थोडा बदल केला जाईल. आपण हे ऑनलाइन खरेदी देखील करू शकता.
७) आरोग्य विमा :- जर अचानक तुमची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी महागड्या औषधांची लांबलचक यादी दिली, किंवा जर अचानक तुमचा एखादा अपघात झाला किंवा तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला रुग्णालयात दाखल केले जाईल. मग येणार मोठा खर्च कसा भागवायचा? यासाठी आरोग्य विमा आपल्यासाठी फायदेशीर ठरतो. हा विमा असल्यास कंपनी हॉस्पिटल व औषधांची बिले भरते. बर्याच कंपन्या कार्डे प्रदान करतात, ज्याद्वारे तुम्हाला कॅशलेस उपचार घेता येतात.
यात दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकार मध्ये केवळ ऍडमिटसाठी क्लेम केला जाऊ शकतो. किरकोळ रोगांबद्दल क्लेम केला जात नाही. उदा. अचानक दातामध्ये मोठी समस्या आली आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि लांबलचक बिल आले याचे कव्हरेज मिळत नाही. दुसरा प्रकार म्हणजे व्होल कव्हरेज, ज्यामधून विमा कंपनीने डॉक्टरची फी, औषधे हॉस्पिटलायझेशन आदी इन्क्लुड असतात. ताप, दातदुखीपासून रुग्णालयात दाखल होईपर्यंत सर्व खर्च दिला जातो.
८) दुचाकी विमा- भारतात दुचाकी विमा अनिवार्य आहे. हे आपल्याला आपल्या बाईक किंवा स्कूटरसह विमा प्रदान करते. जर एखाद्या अपघातात आपल्या वाहनाचे बरेच नुकसान झाले असेल तर आपण त्या अंतर्गत दावा करू शकता. आणि जर एखादे दंगा, जाळपोळ आदी दरम्यान आपले वाहन जाळले असेल, तरीही कंपनी आपल्याला पैसे देते.
९) पेंशन प्लॅन – भारतातील बर्याच लोकांना असे वाटते की निवृत्तीवेतन केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहे. अशा अनेक विमा कंपन्या आहेत ज्या पेन्शन योजना देतात. निवृत्तीनंतर तुमच्या भविष्याचे रक्षण करणार्या या योजना आहेत. ज्या दिवशी आपण आपली नोकरी सुरू कराल त्याच दिवशी आपण सेवानिवृत्तीबद्दल विचार करण्यास सुरवात केली पाहिजे.
नोकरी दरम्यान, आपल्याला दरमहा तीन महिने, सहा महिने किंवा वर्षासाठी थोडीशी रक्कम गुंतवावी लागेल. यात आपल्याला 80 सीसीसी अंतर्गत करात सूट देखील मिळते. आणि शेवटी जेव्हा तुम्ही सेवानिवृत्त व्हाल, तर तुम्हाला पेन्शन मिळू लागेल. आपल्या मृत्यूनंतर आपल्या जोडीदारास निवृत्तीवेतनाची रक्कम मिळते.
१०) वैयक्तिक अपघात विमा- वैयक्तिक अपघात विमा योजनामध्ये एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कुटुंबास बरीच रक्कम मिळते. आणि विमा कंपनी केवळ मृत्यूवरच नाही तर अपंगत्व आले तरीही कंपनी पैसे देते जेणेकरून आपले उर्वरित आयुष्य सुरक्षित व्यतीत होईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम