अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरात युवकांना संघटित करुन पक्ष वाढविण्याचे काम उत्तमपणे सुरु आहे. अहमदनगर शहर रामदास आठवले यांचा बालेकिल्ला असून, आरपीआय जोमाने वाढत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या ध्येय, धोरणानूसार केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन पक्षाचे कार्य सुरु आहे.
या कार्याने प्रेरित होऊन मोठ्या संख्येने युवकांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांच्या उपस्थितीत गौरव भाकरे यांचा प्रवेश करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, चंद्रकांत भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे, रमेश भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे,
राहुल भिंगारदिवे, सुशील अल्लाट, मोहम्मद सय्यद, बबन भिंगारदिवे, प्रा.विलास साठे, किरण काळे, सागर वैरागर, शुभम भाकरे, प्रदीप पाटोळे, करण साळवे, भूषण भाकरे, निकेश कळकुंबे, अजय चांदणे, रवी काते, राहुल काळे, बॉबी पंडित, सनी भाकर, वैभव लोंढे, बॉबी गायकवाड आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
निलक्रांती चौक सिद्धी बाग येथील बुद्धविहार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आघाडीची बैठक घेऊन विविध भागातील युवकांनी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयमध्ये प्रवेश केला.
आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करण्यास बळ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने चालणार्या पक्षात सर्व युवकांचे स्वागत असून, वंचित घटकातील समाजाच्या न्याय, हक्कासाठी युवक प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
तसेच येणाऱ्या काही दिवसातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भव्य युवक व युवती मेळावा घेणार असल्याचे म्हणाले. व संपूर्ण जिल्हा रिपब्लिकन मय करणार तसेच याप्रसंगी प्रास्ताविक विलास साठे सर यांनी केले व स्वागत रमेश भिंगारदिवे यांनी केले तर विजय भांबळे यांनी आभार मानले.