‘या’ कारणामुळे झाली अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ पत्रकाराची हत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील जमिनीच्या वादातून पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे,  मुख्य आरोपी कान्हु मोरे सह चार साथीदारांविरोधात 942 पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. 

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते 

राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no. 286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी व तोफिक मुक्तार शेख या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती 

तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक  मनोज पाटील  यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास Dysp संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

Dysp मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हु गंगाराम मोरे हा नेवासा फाटा येथे पैसे घेण्यासाठी येणार असले बाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने  त्यास सापळा रचून शिताफीने अटक केली. व त्यास न्यायालयात हजर केले. 

न्यायालयात  जोरदार युक्तिवाद करून 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळवून  सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला.यातील दुसरा फरार आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता. बीनंदनकी जिल्हा फत्तेपूर उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक केली.

सदर गुन्ह्याचा तपास  सुरू असताना व्यापारी अनिल गावडे  याने आरोपी कान्हु  मोरे यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा  होती. 

परंतु  सर्व राजकीय दबाव झुगारून व्यापारी गावडे यास आरोपी केले व भादवि कलम 212 प्रमाणे वाढवून  न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर करण्यात आला 

सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा श्रीरामपूर विभागाचे Dy.s.p. संदीप मिटके यांनी मुदतीत तपास पूर्ण करून मुख्य आरोपी कान्हु मोरे याचे सह चार आरोपी विरोधात दोषारोप पत्र आज रोजी न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

मुख्य आरोपी कान्हु मोरे सह चार साथीदारांविरोधात 942 पानांचे दोषारोप पत्र दाखल 

आरोपींची नावे –

1)कान्हु गंगाराम मोरे

2)लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी

3)तोफिक मुक्तार शेख

4)अक्षय सुरेश कुलथे

5)अनिल जनार्धन गावडे

अहमदनगर लाईव्ह 24