रिक्त पदांच्या भरतीसाठी त्या नगरसेवकांचे मंत्र्यांना निवेदन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापालिकेतील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

बोराटे यांनी या संदर्भात थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले आहे. महापालिकेने सहा फेब्रुवारी २०१६ रोजी सुधारित आकृतीबंध मंजूर केला आहे.

यानुसार महापालिकेत भरती करताना ३५ टक्के खर्चाची मर्यादा नमूद केली आहे. यानुसार महापालिकेतील सर्व विभागातील ५७६ रिक्त पदे भरण्याची परवानगी आहे.

कोरोना संकटामुळे मंदीची परिस्थिती आहे. बेरोजगारी वाढली आहे. महापालिकेने हे रिक्त पदे भरल्यास रोजगार तयार होईल.

कोरोना काळात रिक्त पदे भरल्यास कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे. कर्मचार्‍यांअभावी मनपाचे देशपांडे रुग्णालय,

तसेच रक्तपेढी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही भरती या काळात राबविल्यास अहमदनगर शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24