अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची अवघ्या सहा महिन्यातच शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी सोलापूर येथील मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील आज पदभार स्वीकारण्यासाठी नगरला येत आहेत. मावळते पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची कारकीर्द अवघ्या सहा महिन्यांत संपुष्टात आली.
अखिलेशकुमारसिंह यांनी 02 एप्रिल रोजी नगरचा पदभार घेतला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यात चांगले काम होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली.
नगरच्या बहुतांशी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही त्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा होती.
गेल्या महिनाभरापासून त्यांच्या बदलीचे वारे वाहत होते. अखेर त्यांच्या जागी नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे आज आपला पदभार स्वीकारणार आहे.
दरम्यान सोलापूर मध्ये मराठा आरक्षणाची ज्योत पेटलेली असताना त्यांना सोलापूर सोडणे शक्य नव्हते म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्यांची नगर एंट्री लांबणीवर पडली होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved