आर्थिक

Mumbai Bharti 2024 : पदवीधर आहात? ‘या’ फायनान्स कंपनीमध्ये मिळणार नोकरीची संधी !

Published by
Ahmednagarlive24 Office

Cent Bank Home Finance Ltd Bharti : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत, ही भरती मुंबईत होत असून, येथील उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत “मुख्य जोखीम अधिकारी (CRO) – व्यवस्थापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तसेच यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील, तसेच येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा ६२ वर्षे इतकी आहे. इच्छुक उमेदवार अर्ज सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे एचआर, कॉर्पोरेट कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एमएमओ बिल्डिंग, सहावा मजला, एमजी रोड, फोर्ट फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौक, मुंबई-400001. या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात.

तसेच भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.cbhfl.com/ ला भेट देऊ शकता. या भरती साठी अर्ज कसा करावा पुढीलप्रमाणे :-

अर्ज करण्याची पद्धत :-

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तरी अर्ज पोस्टाने अर्ज 02 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत, यापुढे आलेले अर्ज स्वीकारले जाणारनाहीत .

-अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने देखील गरजेचे आहे, जर एखाद्या उमेदवाराने अर्जसह कागदपत्राची प्रत जोडली नसेल तर त्याचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही. अर्ज पूर्ण समजून तो नाकारला जाईल. जर तुम्हाला भरती जाहिरात वाचवायची असेल तर येथे क्लिक करा.

Ahmednagarlive24 Office