अनेकांनी शेअर मार्केटची दुकाने थाटली असून, यामध्ये व्यापाऱ्याबरोबरच आता सर्वसामान्य नागरिक देखील या फंड्यामध्ये गुरफटले जात आहेत. श्रम नं करता शिल्लक असलेल्या पैशाच्या सहाय्याने कुटुंबाचे एकुण उत्पन्न कसे वाढवता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून असतांना झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजन या प्रवाहामध्ये अडकले जात आहेत.
शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली बाजारात अनेकांनी दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडुन १ लाख रुपये गुंतवणुकीमधुन ५, ८ किंवा १० टक्के व्याजदरांने महिन्याकाठी पैसे दिले जात असल्याने व्यापारी उद्योजकांपर्यंत सिमीत असलेला शेअर मार्केटचा फंडा आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचला आहे.
याच फंड्यामुळे सध्या सर्वत्र गुंतवणुकीचे पेव फुटल्याचे पहायला मिळत आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करून फसगत झाल्याची आनेक ताजी उदाहरणे असतांना आणि शेअर मार्केटचा अभ्यास नसतांना देखील दुसऱ्याला महिन्याकाठी मोठ्याप्रमाणात व्याज येत आहे म्हणून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले जात आहेत.
पैसे गुंतवणे जोखमीचे असतांना देखील शेवगाव तालुक्याच्या पुर्व भागातील व्यार्पा- यासह सर्वसामान्य नागरिक यामध्ये गुरफटतांना दिसत आहे. शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी महिन्यांच्या बोलीवर ५, ८ आणि १० टक्के व्याजदरावर वेगवेगळ्या ठिकाणी लाखापासुन एक कोटी रुपयापर्यंत पैसे गुंतवणुक केले आहेत.
सध्या गुंतवण्यात आलेल्या पैशाला महिन्याकाठी चांगले पैसे येत असल्याने सर्वच गुंतवणूकदार खुश आहेत परंतु हि जोखीम नविन गुंतवणूकदाराला कितपत पथ्यावर पडेल हे मात्र काळच ठरवणार आहे.