आर्थिक

Solar Business Idea: कमी गुंतवणुकीत सौर पॅनलशी संबंधित सुरू करा ‘हे’ व्यवसाय! महिन्याला कमवाल 40 हजार ते 1 लाख

Published by
Ajay Patil

Solar Business Idea:- सध्या सौर ऊर्जा वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात असून सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबवल्या जात आहेत व या योजनांच्या माध्यमातून शेतातील विहिरीवरील सौर कृषीपंप असो किंवा घराच्या छतावर उभारण्यात येणारे सौर पॅनल असो याकरिता अनुदान देण्यात येते.

त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सौर ऊर्जेचा वापर व त्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे साहजिकच सौर ऊर्जा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विकसित होत असल्याकारणाने त्या संबंधित असलेल्या व्यवसायांना देखील येणाऱ्या दिवसात सुगीचे दिवस येतील हे मात्र निश्चित.

त्यामुळे तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही सोलर पॅनल किंवा सौर ऊर्जेशी संबंधित व्यवसायामध्ये जर आजच सुरुवात केली तर येणाऱ्या काळात तुम्ही यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती करू शकतात.

याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये सौर पॅनल किंवा सौर ऊर्जेशी संबंधित महत्त्वाचे व्यवसाय बघणार आहोत जे तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरू करून महिन्याला चाळीस हजारापासून ते एक लाख रुपयापर्यंत कमाई आरामात करू शकतात.

 सौर ऊर्जा किंवा सौर पॅनलशी संबंधित हे व्यवसाय करा आणि लाखो कमवा

1- सौर उत्पादने विक्रीचा व्यवसाय सौर उत्पादनांचा हा व्यवसाय करण्याकरिता सरकार मदत करते व सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून जास्त प्रयत्न केले जात आहेत. तुम्हाला देखील हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुरुवातीची गुंतवणूक तीन ते पाच लाख रुपये करून हा व्यवसाय सुरू करू शकतात.

या व्यवसायामध्ये तुम्ही सोलर मॉड्युल( पीव्ही चॅनल), सोलर थर्मल सिस्टम, सोलर कुलिंग सिस्टीम, सोलर फॅन इत्यादींचा व्यवसाय सुरू करू शकतात व या माध्यमातून 40 हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळवू शकतात.

2- सौर ऊर्जा उत्पादनाचा व्यवसाय सौर उर्जेवर चालणारी उपकरणे विकून तुम्ही चांगल्या प्रकारे नफा या व्यवसायाच्या माध्यमातून मिळवू शकतात. आपल्याला माहित आहे की आजकाल सौर उपकरणाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे व या उपकरणांमध्ये सोलर वाटर हीटर, सोलर पंप,

सोलर लाईट तसेच सोलर मोबाईल चार्जर,सोलर लॅम्प इत्यादींची विक्री करू शकतात व हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे गुंतवणुकीकरिता एक ते दोन लाख रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे. हा व्यवसाय जर तुम्ही सुरू केला तर दरमहा वीस हजारापासून ते 50 हजार रुपयापर्यंत तुम्ही कमाई करू शकता.

3- सौर  उपकरणे देखभाल आणि दुरुस्ती किंवा स्वच्छता केंद्र हा व्यवसाय खूप सोपा असून यामध्ये तुम्हाला फक्त सौर उपकरणाची देखभाल आणि स्वच्छतेसाठी साफसफाई केंद्र सुरू करणे गरजेचे राहील. या प्रकारच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करून नफा मात्र जास्त मिळवू शकतात.

तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सुरुवातीला 50 हजार ते एक लाख रुपये भांडवल टाकावे लागेल व यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करून तुम्ही या व्यवसायातून दरमहा वीस हजार ते 35 हजार रुपये कमवू शकता.

4- सौर सल्लागार जर तुम्हाला सौर ऊर्जा आणि सौर उत्पादनांचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही सौर सल्लागाराचा व्यवसाय सुरू करू शकतात. यामध्ये तुम्हाला सौर उपकरणांची वैशिष्ट्ये काय आहेत व त्यांचे कार्य प्रणाली, फायदे तोटे आणि सोलर उत्पादकांची माहिती ग्राहकांना द्यावी लागते.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे एक ऑफिस आणि वेबसाईट असणे गरजेचे आहे. सौर सल्लागार म्हणून तुम्ही दरमहा 40000 पेक्षा जास्त उत्पन्न देखील यामध्ये मिळवू शकतात.

5- सौर आर्थिक सल्लागार हा अशा स्वरूपाचा व्यवसाय आहे की त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाही गुंतवणूक करण्याची गरज नाही. सोलर फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून तुम्हाला सरकारी आणि गैरसरकारी संस्थांकडून सौर प्रकल्प उभारण्यासाठी अर्थसहाय्य मिळवण्याकरिता ग्राहकांना मदत करावी लागते.

याकरिता तुम्हाला ठराविक रक्कम यामध्ये मिळते व ती मासिक उत्पन्नामध्ये 30000 पेक्षा जास्त नफ्याच्या स्वरूपात असू शकते.  हा कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.

Ajay Patil