Reliance Jio Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओला एअरटेल कडून मात्र कडवी झुंज दिली जात आहे. अलीकडे एअरटेलची ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एअरटेलच्या ग्राहक संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
दुसरीकडे जिओची ग्राहक संख्या देखील मोठ्या प्रमाणात वधारत आहे. यामुळे सध्या एअरटेल आणि रिलायन्स जिओ यामध्ये मोठे कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे की, या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना स्वस्तात चांगले रिचार्ज प्लॅन ऑफर केले जात आहेत. या दोन्ही कंपन्यांनी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत.
दरम्यान आज आपण रिलायन्स जिओच्या चार अशा रिचार्ज प्लानची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये 56 दिवसांची व्हॅलिडीटी ग्राहकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हे चारही प्लॅन ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया रिलायन्स जिओच्या या चार 56 दिवस व्हॅलिडीटी असलेल्या प्लॅन विषयी सविस्तर माहिती.
रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लॅन :- आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओकडून वेळोवेळी नवनवीन प्लॅन लॉन्च केले जात असतात. कंपनीकडून स्वस्तात रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जातात. दरम्यान, कंपनीने 533 रुपयांचा एक प्लॅन लॉन्च केला आहे.
यामध्ये ग्राहकांना डेली दोन जीबीचा डेटा मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 56 दिवस एवढी आहे. या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ सिनेमाचे सबस्क्रीप्शन मोफत मिळते. कंपनीने 589 रुपयांचा देखील एक प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये ग्राहकांना 56 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 2 जीबी डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच इतरही लाभ पुरवले जातात. यात डेली 100 एसएमएस चा लाभ मिळतो. जिओने 529 रुपयांचा आणखी एक प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि 56 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते.
जिओ सावन प्रो, जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा यांचे सबस्क्रीप्शन देखील मोफत मिळते. याशिवाय कंपनीने 479 रुपयांचा 56 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन देखील लॉन्च केला आहे. यामध्ये कंपनीकडून डेली दीड जीबी डेटा मिळतो. यात जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रीप्शन देखील मिळते.