अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी आलेल्या ८९ उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी करण्यात आली असून यातील १३ अर्ज अवैध ठरले आहेत.

छाननीमध्ये प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार लंकाबाई देविदास खरात यांच्या अर्जावर त्यांचे पती नगरपंचायतचे ठेकेदार असल्याबाबत हरकत घेण्यात आली.

प्रियंका केतन खरात यांच्या अर्जावर या उमेदवाराचे वय २१ वर्षाच्या आत असल्याची हरकत मंगेश तुकाराम कचरे यांनी घेतली. प्रभाग क्रमांक ८ मध्ये बबन लाढाणे यांनी भाऊसाहेब तोरडमल यांच्या अर्जावर हरकत घेतली.

मात्र छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही हरकती फेटाळून लावल्या. हे दोन अर्ज वैध ठरविण्यात आले. प्रतिज्ञापत्रावर सह्या नसल्याने

पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. ज्या उमेदवारांच्या अर्जाला राजकीय पक्षांचे अधिकृत एबी फॉर्म नव्हते असे आठ अर्जही अवैध ठरविण्यात आले.