अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  पारनेर नगरपंचायातीच्या चार प्रभागांमध्ये १८ जानेवारी रोजी होणाऱ्या चार जागांच्या निवडणुकीसाठी १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये दुरंगी,प्रभाग क्रमांक २ मध्ये तिरंगी तर प्रभाग क्रमांक ११ व १३ मध्ये बहुरंगी लढती होणार असल्याचे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले.

प्रभाग क्रमांक १३ मधून कल्पनाबाई अर्जुन शिंदे यांनी तर प्रभाग क्रमांक ११ मधून राजू बशीर शेख,हसन अमीर राजे,सागर अशोक चेडे,सुहास रेपाळे यांनी अर्ज मागे घेतले.

विविध प्रभागातील उमेदवार पुढीलप्रमाणे – प्रभाग क्रमांक २ स्वाती नीलेश खोडदे (शिवसेना), उषा अर्जुन व्यवहारे (शहर विकास आघाडी), सुप्रिया सुभाष शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस). प्रभाग क्रमांक ११ विलास तुकाराम मते (अपक्ष),

उमेश माणिकराव औटी (शिवसेना), विजय बाबूराव डोळ (राष्ट्रवादी), अशोक फुुलाजी चेडे (भाजपा). प्रभाग क्रमांक १३ विपुल संजय औटी (अपक्ष), विशाल अर्जुनराव शिंदे (शहर विकास आघाडी),

ज्ञानेश्‍वर बाळासाहेब औटी (शिवसेना), विजय सदाशिव औटी (राष्ट्रवादी काँग्रेस). प्रभाग क्रमांक १४ अनिता देवराम ठुबे (शिवसेना), मयुरी नंदकुमार औटी (राष्ट्रवादी काँग्रेस).