अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 18 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

पदोन्नती मिळालेल्यांमध्ये संतोष बनकर (शवाशा शिर्डी), दिनेश चक्रनारायण (पोलीस मुख्यालय), चंद्रकांत भोंगळे (राहाता), भास्कर पिचड (संगमनेर शहर), विक्रम कांबळे (पोलीस मुख्यालय),

हनुमंत आव्हाड (राहुरी), गोरक्षनाथ भवार (शेवगाव), संतोष येलूलकर (मसुप नगर), किरण बारवकर (पोलीस मुख्यालय), शशिकला हांडे (संगमनेर तालुका),

सचिन काटे (मसुप तिसगाव), प्रदीप वाकचौरे (पोलीस मुख्यालय), सुनीता सुर्यवंशी (राहुरी), महेश आहेर (अकोले), मधुसुदन दहिफळे (लोणी), यशवंत दहिफळे (शवाश नगर),

भानुदास सोनवणे (नगर तालुका), संदीप काळे (जिविशा) यांचा समावेश आहे. पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळाल्याने जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचार्‍यांचा त्या-त्या पोलीस ठाण्यात सन्मान करण्यात येत आहे.