file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 18 हजार 376 कांदा गोण्याची आवक झाली आहे.

उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 3 हजार रुपयांपर्यंत तर नवीन कांद्याला 2700 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. जाणून घ्या कांदा दर…. उन्हाळी कांद्यातील मोठ्या मालाला 2500 ते 2700 रुपये, मध्यम मोठ्या मालाला 2000 ते 2200 रुपये,

मध्यम मालाला 1800 ते 1900 रुपये, गोल्टी कांद्याला 1000 ते 1500 रुपये, गोल्टा कांद्याला 1500 ते 1800 रुपये तर जोड कांद्याला 300 ते 400 रुपये भाव मिळाला.

तर एक-दोन वक्कलांना 2800 ते 3000 रुपये भाव मिळाला. नवीन मालाला 500 ते 2500 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. दरम्यान बाजार समितीमध्ये मालाची आवक देखील वाढू लागली आहे.