Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingLifestyle

‘असा’ झाला आ.विखे पाटील यांच्या पुतणीचा शुभविवाह !

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करून माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना विवाह सोहळे साध्या पध्दतीने करण्याचे आवाहन केले होते.

त्‍या आवाहानाला विखे पाटील कुटुंबातून देखील प्रतिसाद मिळाला आ.विखे पाटील यांची पुतणी शिवानी हिचा शुभविवाह देखील अगदी साध्‍या पध्‍दतीने लोणीतील निवासस्‍थानी संपन्‍न झाला. कौटुंबिक स्वरूपात शिवानी आणि वैभव यांचा विवाह सोहळा साध्या पध्दतीने करून विखे पाटील आणि ढूस पाटील परिवाराने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

तसे या विवाहाचे नियोजन जानेवारी २०२० पासून सुरु झाले होते वधु आणि वराची पसंती, दोन्ही घरातील ज्येष्ठांची औपचारिक बोलणी आणि सहमती यासारखे सोपस्कार पार पडले. मार्च महिन्यात विवाह मुहूर्त ठरला, लग्नासाठी दोन्ही घरची धावपळ सुरू झाली. परंतु कोरोनाच्या विषाणूने देशातच नव्हे संपूर्ण जगात कहर केला..

त्यामुळे मार्च महिन्यामध्ये ठरलेला लग्नसोहळा पुढे ढकलावा लागला.. पुन्हा दोन्ही घरच्या सदस्यांच्या चर्चा बैठका झाल्या, मे महिन्याचा मुहूर्त ठरला. परंतु तो पर्यंत कोरोणाचे संकट आणखी गडद झाले व शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. सर्व बाजूने अडचणीत वाढ होत गेली, शासनाने लग्न समारंभ करण्यास निर्बंध घातल्याने लग्न सोहळा पुढे ढकलावा लागला.

जुलै महिन्यार्यंत कोरोनाचे संकट कमी होईल या आशेने पुन्हा तिसऱ्यांदा जुलै पर्यंत लग्न पुढे ढकलण्यात आले. सप्टेंबर मध्ये पितृपक्ष लागणार होते म्हणून माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने हा विवाह सोहळा २८ ऑगस्ट २०२० रोजी दु १२ ते १ लग्न विधी, १ ते २ वा.

लग्न सोहळा आणि दुपारी २.१५ वा. मुलीची बिदायी असा छोटेखानी विवाहसोहळा या सोशल डिस्टसिंगचे पालन करून अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला. या विवाहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोणताही बडेजाव नाही, लग्न पत्रिका नाही, मोठा मंडप, वाजंत्री, ढोल ताशे नाही, लाऊड स्पीकर नाही, अक्षतांची नासाडी नाही, कोणताही सत्कार समारंभ नाही.

अश्या एकदम साध्या व कौटुंबिक पद्धतीने आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमांची अंमलबजावणी करून हा विवाह सोहळा संपन्न झाला. स्व. सिंधुताई व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, व सौ. मंदाताई व भाऊसाहेब विखे पाटील यांची नात चि. सौ. का. शिवानी यांचा विवाह राहुरी तालुक्यातील भिमराज रामजी ढूस पाटील यांचे नातू

आणि महाराष्ट्र शासनाच्या शिव छत्रपती राज्य साहसी पुरस्काराने सन्मानित झालेले प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस आणि सौ. हेमलता व अरुण भिमराज ढूस यांचे जेष्ठ चिरंजीव चि.वैभव यांच्याशी लोणी येथील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे वस्तीवरील भाऊसाहेब विखे पाटील यांचे निवासस्थानी

केवळ १५ पाहुण्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह प्रसंगी विखे पाटील कुटुंबातील जेष्ठ सदस्य भाऊसाहेब विठ्ठलराव विखे पाटील सौ.मंदाताई विखे पाटील, माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील,

कारखान्‍याचे माजी संचालक विक्रांत विखे पाटील, सौ.स्मिता विखे पाटील, डॉ.विक्रम विखे पाटील, डॉ. मृण्मयी विखे पाटील, विजय विखे पाटील, सौ. गीता विखे पाटील, प्रवरा मेडीकल ट्रस्‍टचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील, सौ.सुवर्णाताई राजेंद्र विखे पाटील, सौ.अरूनाताई घोगरे,

सौ.अनिताताई कोल्हे, अॅड.यशवंतराव कानवडे, बाळासाहेब शिंदे, भिमराज ढूस, दत्तक माता सौ. हेमलता व दत्तक पिता अरुण ढूस, सौ. नंदा व वडील श्री आप्पासाहेब ढूस, प्रसाद ढूस, सौ.मीना राजेंद्र ढूस, गोरख ढोकणे, मंदा व श्री.एकनाथ कालांगडे, सौ. संगीता व सोपान सौदागर, अशोकराव बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button