अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- भारताचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अनेक क्रीडा, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींना राष्ट्रपती भवनात या पुरस्काराने सन्मानित केले.

वर्ष २०२१ संपायला फक्त एक आठवडा उरला आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात कोणत्या बॉलिवूड कलाकारांना यावर्षी पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

सुरेश वाडकर :- हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनाही २०२० या वर्षासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सरिता जोशी :- बा बहू और बेबी’ (2005-10), ‘गंगूबाई’ (2013) आणि ‘हमारी बहू सिल्क’ (2019) यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली टीव्ही ज्येष्ठ अभिनेत्री सरिता जोशी यांनाही अभिनय क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

करण जोहर :- प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर यांना 2020 या वर्षासाठी चित्रपट क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कंगना रणौत :- बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना रणौतलाही २०२० चा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. कंगना एक चित्रपट अभिनेत्री असण्यासोबतच चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून देखील काम करत आहे.

एकता कपूर :- टीव्हीची ‘क्वीन’ आणि निर्माती एकता कपूरलाही कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने (2020) सन्मानित करण्यात आले.

अदनान सामी :- संगीतकार आणि अप्रतिम गायक अदनान सामीला 2020 साठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.