महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील ३१ गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होऊ लागला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. नुकतेच या मुद्द्यावरून विभागीय आयुक्तांनी देखील प्रशासनाला चांगलेच खडसावले आहे.

यामुळे आता प्रतिबंधात्मक पाऊले उचलली जाऊ लागली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील ३१ गावांमध्ये करोना बाधितांची संख्या दिवस गणीक वाढत असल्याने ही गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

३१ गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर तालुक्यातील खळी, पिंप्री लौकी अजमपूर, जाखुरी, पानोडी येथील हजारवाडी, राजवाडा, टेकेवाडी, ढोणेवस्ती, तळेगाव दिघे येथील भागवतवाडी, मनोली, घुलेवाडी येथील श्रीराम कॉलनी, कनोली, शेडगाव,

पिंपरणे येथील राहिंज वस्ती, निमगाव बुद्रुक गावठाण, निमगावजाळी, आश्वी खुर्द मातंग वस्ती, राजापूर, सायखिंडी नन्नवरे वस्ती व खळी वाडग, गुंजाळवाडी दोन कुटुंब वस्ती, वनकुटे, चिकणी वर्षे वस्ती, आश्वी बुद्रुक, खांडगाव, वडगावलांडगा, मांडवे बुद्रुक, चंदनापुरी,

कोल्हेवाडी, चिंचपूर बुद्रुक, निमोण, मेंढवण, मालुंजे, पेमगिरी ही गावे १४ दिवस प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातून करोना हद्दपार व्हावा यासाठीचे प्रयत्न होत असताना आता शहरासह ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळेच तालुक्यातील ३१ गावांमध्ये प्रशासनाला प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करावे लागले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!