Gaming Phone(5)
Gaming Phone(5)

Gaming Phone : 20000 रुपयामंध्ये गेमिंगसाठी कोणता फोन चांगला आहे? भारतीय मोबाइल बाजारात अनेक प्रकारचे स्मार्टफोन आहेत, जे वेगवेगळ्या किंमती आणि वैशिष्ट्यांसह येतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर संभ्रम नक्कीच आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे गेमिंगसाठी चांगले आहेत आणि त्यांना बेसिकपेक्षा अधिक प्रगत गेमिंगसाठी चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणार्‍या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

गेमिंगसाठी सर्वोत्कृष्ट, हे 5 सर्वोत्तम स्मार्टफोन जे 20 हजार रुपयांपासून स्वस्तात मिळतात

-iQOO vivo Z5 5G Amazon वरून 19,990 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच, यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे स्नॅपड्रॅगन 778G 5G प्रोसेसरसह येते. यात 5000 mAh बॅटरी आहे, ज्याला चार्जिंगसाठी 44 वॉटचा चार्जर देण्यात आला आहे. उत्तम गेमिंग अनुभवासाठी 120 Hz चे रिफ्रेश रेट दिला आहे.

-OPPO A74 5G Amazon वरून 14990 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, 6.49 इंच फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन 2400×1080 पिक्सेल आहे. यात साइड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 480 चिपसेटसह येतो. यात 5G सपोर्ट देखील आहे. या मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर बॅक पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सल्सचा प्राथमिक कॅमेरा आहे तसेच, यात 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

-Redmi Note 10 Pro 15999 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह येतो. यात 120 Hz चे रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. हा एक एमोलेड पॅनेलसह येणारा स्मार्टफोन आहे. याच्या मागील पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 64 मेगापिक्सेल आहे. तसेच 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये यूजर्स 512 GB पर्यंत SD कार्ड ठेवू शकतात.

-Vivo iQOO Z6 44W Amazon वरून 16999 रुपयांना खरेदी करता येईल. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज या किमतीत खरेदी करता येईल. याशिवाय, यात 44 वॉटचा फास्ट चार्जर आणि 5000 mAh बॅटरी आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सह येतो. यामध्ये यूजर्सना संपूर्ण ETZ Plus AMOLED पॅनल देण्यात आले आहे. यात 50 मेगापिक्सल्सचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

-Samsung Galaxy M33 5G 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह खरेदी केला जाऊ शकतो. यात 6000 mAh बॅटरी आहे. यात व्हर्च्युअल रॅमचा पर्यायही आहे. यात मागील पॅनलवर 50 मेगापिक्सल्ससह क्वाड कॅमेरा सेटअप आहे.