अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात भोंग्यांचा विषय उपस्थित केलेल्यानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सराकारने तेथे कारवाईसाठी मोहीम हाती घेतली आहे.

तेथे आतापर्यंत धार्मिक स्थळांवर असलेले ५३,९४२ बेकायदा भोंगे उतरवण्यात आले असून, ६० हजार भोंग्यांचे आवाज हे नियमानुसार असल्याचे आढळून आल्याने ते कायम ठेवण्यात आले आहेत.

२६ एप्रिलपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला लक्ष्य न करता सर्व प्रार्थनास्थळांची तपासणी करण्यात येत आहे.

उतरवले गेलेले भोंगे हे बेकायदा होते. कोणतीही परवानगी न घेता बसवण्यात आले होते. त्याचीच तपासणी करून ही कारवाई करण्यात आली.

असे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले. मात्र, ही कारवाई न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तर इकडे राज ठाकरे यांनी यावरून उत्तर प्रदेश सरकारचे कौतूक करून तेथे होत असेल तर महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.