file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये विविध प्रकारचे ८४ हजार २२१ प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती.

यातून तब्बल ७२ कोटी रुपयांची वसुली कर करण्यात आली आहे. काल जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सर्व न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन.आय.ॲक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्यातील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे,

वीज महावितरणची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्या करीता ठेवण्यात आली होती. अहमदनगर जिल्हयामध्ये १३ हजार १४८ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर २ हजार ९५२ प्रलंबीत प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.

तसेच ७२ कोटी ६७ लाख रक्कमेची वसुली करण्यात आली. ८४ हजार २२१ प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती. १६ हजार १०० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे हे लोकअदालत अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,

अहमदनगर सुधाकर यार्लगड्डा व जिल्हा न्यायाधीश मिलींद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष भुषण बऱ्हाटे, सेंट्रल बार असोसिएशन अध्यक्ष सुभाष काकडे, सरकारी वकील सतिश पाटील व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडले.