7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) एक खुशखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची (DA) प्रतीक्षा आता संपली आहे.

केंद्र सरकारकडून (Central Govt) कर्मचाऱ्यांना नवरात्रीला (Navratri) महागाई भत्त्याची भेट मिळणार आहे. 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना (Pensioners) याचा लाभ मिळणार आहे.

लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा 

सरकारच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ झाल्यामुळे देशातील सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून मिळणार वाढीव पगार मिळेल. DA 38 टक्के वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 27312 रुपयांनी वाढ होणार आहे.

डीएची थकबाकी मिळेल

7 व्या वेतन आयोगातील सध्याच्या रचनेत, DA आणि DR सर्व केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के दराने दिले जात आहेत. पण, सप्टेंबरनंतर 38 टक्के दराने पेमेंट होणार आहे. यासोबतच तुम्हाला मागील 2 महिन्यांच्या डीए थकबाकीचाही लाभ मिळेल.

DA किती वाढेल

यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. यानंतर तो 34 ते 38 टक्के वाढेल सध्या सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. DA 38% असल्याने पगारात चांगली वाढ होईल.

27000 च्या जवळपास पगार वाढणार

7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56900 रुपये असेल आणि त्यांना 38 टक्के दराने DA मिळेल. त्यामुळे त्याच्या खात्यात 21622 रुपये DA म्हणून येतील. सध्या या कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने 19,346 रुपये मिळत आहेत.

डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केल्यास पगारात 2276 रुपयांनी वाढ होईल. म्हणजेच तुमचा पगार वर्षाला 27312 रुपयांनी वाढेल.