7th pay commission
7th pay commission

7th Pay Commission : केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी सतत काही ना काही निर्णय घेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Staff) महागाई भत्त्यात (DA) ३ टक्क्यांनी वाढ केली आहे.

तसेच आता पुन्हा केंद्र सरकार (Central Goverment) नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत (Salary) केंद्र सरकार नवा फॉर्म्युला (New formula) आणण्याच्या तयारीत आहे. जुलै 2016 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही याबाबत संकेत दिले होते.

कामगिरीच्या आधारे पगार वाढवण्याची तयारी

तेव्हा कर्मचाऱ्यांनी वेतन आयोगाच्या पलीकडे जाऊन विचार करावा, असे ते संसदेत म्हणाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत नवीन वेतन आयोग येणार नाही. कर्मचार्‍यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांच्या पगारात वाढ करण्याची सरकारची तयारी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी असा फॉर्म्युला तयार करत आहे, ज्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त महागाई भत्ता असल्यास पगार आपोआप वाढेल.

याला ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टम (Automatic pay revision system) असे नाव दिले जाऊ शकते.

सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत कर्मचारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या ज्या प्रकारे महागाईचा दर वाढत आहे, 2016 पासून सुरू असलेल्या व्यवस्थेतून आपला खर्च भागवणे कठीण असल्याचेही कर्मचाऱ्यांचे मत आहे. आता याबाबत सरकारकडून निर्णय होण्याची प्रतीक्षा आहे.

कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढणार नाही

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, यावर्षी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करणार नाही. कोरोना महामारीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्याची अंमलबजावणी करणे कठीण आहे.

पगार वेळोवेळी वाढतच जावा, हा सरकारचा मानस आहे.

पगारवाढीचा नवा फॉर्म्युला आल्यानंतर फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेतला जाईल, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. नवा फॉर्म्युला कसा असेल, याचे चित्र सरकार जाहीर करेल तेव्हाच पूर्णपणे स्पष्ट होईल.

पण, कर्मचाऱ्यांचे पगार वेळोवेळी वाढत राहावेत, असा नवा फॉर्म्युला असावा, असा सरकारचा हेतू असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.