7th Pay Commission
7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) डीए (DA) वाढल्यानंतर आता पुन्हा आनंदाची बातमी (Good News) असून महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक भत्ते वाढण्याची शक्यता आहे.

डीए वाढल्याने प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही (Gratuity) आपोआप वाढतील. वास्तविक, केंद्रीय कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते. अशा परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढण्याची खात्री आहे.

इतकेच नाही तर डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (एचआरए) आणि प्रवास भत्ता (टीए)ही वाढणार आहे. ही वाढ ३ टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

३० मार्च रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे नऊ महिन्यांत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए दुपटीने वाढला आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता ३४ टक्के दराने DA आणि DR मिळेल. या घोषणेचा फायदा ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. मात्र, यामुळे सरकारवर वार्षिक 9544.50 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.

दरम्यान, केंद्रीय कर्मचारी संघटनेकडून थकबाकीसाठी सरकारवर (Government) सातत्याने दबाव आणला जात आहे. पगार आणि भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून तो थांबवता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे.

अशा परिस्थितीत जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीतील डीएची थकबाकी भरण्यासाठी दबाव आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएच्या थकबाकीबाबतही चांगली बातमी ऐकायला मिळते.