‘या’ कडधान्यांच्या काडा पासून तयार करा कमी खर्चात कंपोस्ट खत; जाणून घ्या सविस्तर…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा इतर रासायनिक गोष्टींचा वापर न करता कमी वेळेत उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत या तंत्रज्ञानात तयार करता येते.

बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने मूग उडीद आणि सोयाबीन यासारख्या कडधान्याच्या उपलब्ध काडाचा उपयोग करून कंपोस्ट खत तयार करण्यात येते.

हे बायोडायनॅमिक पद्धतीने कमी खर्चात आणि वेगाने तयार करता येते.या तंत्रज्ञानात तयार केलेल्या कंपोस्ट खतात नत्र, स्फुरद,पालाश इत्यादींचा वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे एकत्रित मिश्रण असते.

तर शेतीसाठी शेणखत हे अत्यंत उपयोगी असून अलीकडील काळात जनावरांच्या संख्येत होत असणारी कमतरता यामुळे शेतीसाठी लागणारे शेणखत मुबलक प्रमाणात मिळत नाही. तर त्याला बायोडायनॅमिक पद्धतीने तयार केलेले कंपोस्ट खत हा एक उत्तम पर्याय आहे.

खत कसे तयार करावे :

1. खत तयार करण्यासाठी शेतातील उंच जागेची निवड करावी. तर त्या जागेची पूर्व पश्चिम दिशेने पंधरा फूट लांब आणि पाच फूट रुंद अशी जागा आखनी करून जगा सपाट करून घ्यावी.

2. निवडलेली जागा ओली करून घेऊन त्यावर मूग, उडीद आणि सोयाबीन यासारख्या काडाचे थरावर थर रचून घ्यावेत.

3.त्याआधी एक बैलगाडी ओले शेन आणि कोणत्याही वनस्पतीचा हिरवा पाला दोन बैल गाडा इतका जमा करून ठेवावे.

4. एकावर एक रचून घेतलेले कडधान्यांचे थर हे चार-पाच दिवस पुरेसे ओले करून घ्यावेत.त्यावर एक ढिगासाठी एक किलो बायोडायनॅमिक एस 9 हे विरजण स्वरूपात लागते.

5.शेनकाला तेरा लिटर पाण्यात एक तासभर उलट सुलट पद्धतीने घोळून तयार करून ठेवावे.

6. पहिला थर हा एक फूट उंचीचा करून त्यावर एस 9 द्रावन शिंपडून त्यावर पुरेसा शेणकाला टाकावा.

7.त्यानंतर हिरव्या झाडाचा पाला एक फूट उंचीपर्यंत पसरवून त्यावर परत एस 9 द्रावण शिंपडावे.

8.नंतर शेनकाला टाकून शेतातील दोन घमेली माती टाकून पसरून घ्यावी.अशा पद्धतीने पहिला थर तयार करून घ्यावा.

9.पहिल्या पध्दतीने केलेल्या थरा सारखे थरावर थर पाच फूट उंचीपर्यंत थर रचून घ्यावेत. नंतर शेनकाला व माती मिसळून आणि उपलब्ध असल्यास पालापाचोळा टाकून तयार केलेले मिश्रण हे ढीग पूर्णपणे जमिनीपर्यंत लिंपून घ्यावा.

कंपोस्ट खत तयार होण्यास लागणारा कालावधी :

1.एका महिन्यानंतर डिगाचा आकार लहान होतो. हा
ढीग फावड्याने उकरून सर मिसळ करून घ्यावे. त्यावर पुरेसे पाणी टाकून ओले करून पुन्हा शेनकाल्याने लिंपून टाकावे.

2. हे खत साठ-सत्तर दिवसात दर्जेदार कंपोस्ट खत तयार होते. यामध्ये नंतर एस 9 टाकण्याची गरज नाही.

3.यामध्ये सर्व पीकासाठी आवश्यक असे कंपोस्ट तयार झालेले असते. जे पदार्थ नुसते शेणखतामध्ये कुजण्यासाठी आठ ते नऊ महिने लागतात.तेच ह्या खतात बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी काळात कुजते.

बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या कंपोस्ट खताचे फायदे  :

1.मूग, उडीद,शेंगांची टरफले, सोयाबीन,सूर्यफुलाची काड इत्यादींची जाळून विल्हेवाट लावली जाते.तर त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट खत केल्यास जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे.

2. तर एका ढिगातून साधारणत: दहा क्विंटल पर्यंत
म्हणजेच 50 किलो वजनाची सुमारे 20 पोती सेंद्रिय खत घरीच तयार होऊ शकते.

3. या मध्ये पिकांसाठी 18 ते 20 किलो नत्र, उपलब्ध स्फुरद 18 ते 20 किलो, पालाश दहा किलोपर्यंत मिळते.

4. याबरोबरच गंध ,झिंक,कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि लोह इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांस मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe