अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Farmer succes story : केल्याने होतं आहे रे ते आधी केलेच पाहिजे ही म्हण आपल्या कानावर नेहमीच पडत असते पण प्रत्येक्षात असे केल्याने यशाला गवसणी घालता येणे शक्य आहे हेच दाखवून दिले आहे वाशिम जिल्ह्यातील (Washim) शिरपूर तालुक्याच्या एका अवलीया शेतकऱ्याने.
तालुक्याच्या मौजे गौरखेडा येथील रहिवासी शेतकरी (Farmer) गजानन तुळशीराम वानखेडे यांनी शेतीत (Farming) जरा हटके करायचा असा विचार केला.
या अनुषंगाने त्यांनी पीकपद्धतीत मोठा बदल करत ब्रोकोली या विदेशी भाजीची लागवड (Brocoli Farming) केली. विशेष म्हणजे व्यावसायिक स्तरावर ब्रोकोलीची शेती (Brocoli Cultivation) करणारे ते वाशिम जिल्ह्यातील पहिले शेतकरी बनले आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गजानन यांच्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. या दोन एकर शेत जमिनीत त्यांनी एकूण दहा गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊसची (Polyhouse Farming) निर्मिती केली आहे.
यासाठी त्यांना शासनाकडून (Government Scheme) मदत देखील मिळाली. पॉलिहाऊस उभारल्यानंतर या अवलिया शेतकऱ्याने बाजारपेठेतील चित्र बघता भाजीपाला पिकाची लागवड (Vegetable Crop) करण्याचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने त्यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये वेगवेगळ्या भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली आहे. यामध्ये त्यांनी विदेशी भाजी म्हणून सध्या भारतीय स्वयंपाकघरात मानाचे स्थान मिळवणाऱ्या ब्रोकोलीची लागवड केली.
ब्रोकोली शिवाय त्यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये वेगवेगळ्या भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली आहे. मित्रांनो ब्रोकोली ही विदेशी भाजी असून फ्लावर सारखीच दिसते. मात्र असे असले तरी दोघांची चव ही भिन्न आहे.
मात्र ब्रोकोली मध्ये असलेले पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर आहेत. यामुळे या विदेशी भाजीला भारतीय बाजारात आता मोठा भाव आला आहे. यामुळे याची मागणी देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
याचाच फायदा घेत गजानन यांनी या विदेशी भाजीची शेती करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या विदेशी भाजीचे त्यांनी यशस्वी उत्पादन देखील घेऊन दाखवले आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना गजानन सांगतात की, शेतकरी बांधवांनी पीकपद्धतीत काळाच्या ओघात बदल करणे आता अतिशय महत्त्वाचे बनले आहे.
असे केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळू शकते असे गजानन यांचे म्हणणे आहे. गजानन यांनी पीकपद्धतीत बदल करण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
निश्चितच अल्पभूधारक शेतकरी असतानादेखील गजानन यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतरांसाठी प्रेरणा देणारा सिद्ध होऊ शकतो.