‘हे तर काहीच नाही, गोपीनाथ मुंडेंनी एकट्याने १७ मते फोडली होती’

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra news : विधान परिषद निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सर्वत्र कौतूक सुरू आहे. मात्र, भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी याला छेद देणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘आता तरी आम्हाला दिल्लीचे पाठबळ आहे. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. तरीही स्व. गोपीनाथ मुंडे यांनी एका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची १७ मते फोडली होती.’ असा जुना प्रसंग सांगितला.

मुख्य म्हणजे सर्वपक्षीय विजयी उमेदवारांचे त्यांनी अभिनंजन केले, मात्र याचे श्रेय देणे तर दूरच फडणवीस यांचा उल्लेख करणेही त्यांनी टाळले.
पंकजा मुंडे नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘संख्याबळ नसताना इतरही अनेक निवडणुका आम्ही लढविल्या आणि जिंकल्याही आहेत. संख्याबळ कमी असूनही आम्ही लढलो आणि जिंकलो आहोत. मला आठवते की एका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी सत्ताधारी पक्षाची १७ मते फोडली होती.

तेही एकट्याने. कोणतेही सामर्थ्य पाठीशी नसताना हे काम केले होते. मात्र, आता आमच्या पाठीशी दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने मोठे सामर्थ्य उभे आहे,’ असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe