IMD Rain Alert : राज्यात आजही मुसळधार पावसाचा जोर! या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Published on -

IMD Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच अजूनही राज्यात पावसाचा जोर कायम असलयाचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. 

महाराष्ट्रातील (Maharashtra) मराठवाड्यात या पावसाचा थेट परिणाम धरणांवर होताना दिसत आहे. येथील 8 धरणांनी यावेळी कमाल पाणी साठवण क्षमता गाठली आहे. त्यांची पाण्याची पातळी खूप जास्त आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील 11 मोठ्या धरणांपैकी 8 धरणांमध्ये आता कमाल पाणीसाठा झाला आहे, तर 11 धरणांची एकूण टक्केवारी 97.98 टक्के आहे.

भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, मुंबईसह ठाणे जिल्ह्यात देखील पावसाची चांगलीच हजेरी बघायला मिळाली. औरंगाबाद, सातारा, सिंधुदुर्ग, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील या भागात मुसळधार पाऊस

महसूल विभागाच्या अहवालानुसार, नांदेडमध्ये 1118.6 मिमी, हिंगोली (992.4 मिमी), जालना (843.8 मिमी), लातूर (802.9 मिमी), औरंगाबाद (728.2 मिमी), उस्मानाबाद (723.1 मिमी), बीड (712.2 मिमी) आणि परभणीमध्ये (700.4 मिमी) पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्रातील पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबले आहे. यावेळी हिंद माता, सायन, कुर्ला आणि अंधेरीसह मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याचे दिसून आले. या भागात रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले असून हे पाणी काढण्यासाठी बीएमसीची टीम जमली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News