Supriya sule : सध्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. सुप्रिया सुळे यांनी मला ‘लव्ह’चा अर्थ माहित आहे. मला ‘जिहाद’चा अर्थ माहित आहे. पण, ‘लव्ह जिहाद’चा अर्थ माहित नाही. ऑक्सफर्डच्या कोणत्याही डिक्शनरीत हा शब्द सापडला नाही.
तसेच कुणाला माहित असल्यास मला त्याचा अर्थ सांगावा. मी चर्चेला तयार आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना भेटून लव्ह जिहादचा अर्थ सांगेन, असे म्हटले आहे. हिंदू मुलीवर अत्याचार करून त्यांना कसे बरबाद केले जाते याची माहिती देईन, असे राणे यांनी म्हटले आहे. यामुळे आता सुप्रिया सुळे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नितेश राणे यांनी, मला माझ्या ज्ञानात भर टाकायची आहे. सुप्रिया सुळे यांनी तारीख, वेळ आणि ठिकाण सांगावं मी तिथे त्यांना भेटेन असे नितेश राणे म्हणाले आहेत. यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी वरील वक्तव्य केले होते. यामुळे नितेश राणे देखील आक्रमक झाले आहेत. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजून प्रतिक्रिया दिली नाही.